प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाविषयी खटला सर्वेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी पेंद्र शासनाने तटस्थतेची भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांसह पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाविषयी सर्वपक्षीय आमदारांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
यावेळी दिलेल्या लेखी उत्तरात खटल्यामध्ये राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ हरिश साळवे, के. परासरन, राकेश द्विवेदी, राजू रामचंद्रन, अरविंद दातार यांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी ‘कोर्ट कमिश्नर’ यांच्यापुढे साक्षी पुरावे सादर करण्यासाठी तज्ञ साक्षीदारांची शपथपत्रे सिद्ध करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








