शिवसेनेच्यावतीने सम्राट अशोक चौक येथे 67 हुतात्म्यांना अभिवादन, महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार कायम
प्रतिनिधी/बेळगाव
शिवसेनेच्यावतीने मंगळवारी सम्राट अशोक चौक येथे शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर व शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना मराठी भाषिकांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, राजकुमार बोकडे, सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर, शहरप्रमुख दिलीप बैलूरकर, महेश टंकसाळी, राजकुमार बोकडे, रमेश माळवी, प्रसाद काकतकर, राहुल कुडे, राजू कणेरी, प्रकाश हेब्बाजी, बाळू मासरणकर, दत्ता पाटील, विनायक बेळगावकर, अथांग जाधव, राजू निलजकर, वैजनाथ भोगण, विनय कोवाडकर, महेश हट्टीकर, किरण जायाण्णाचे, अशोक काकतकर, दिनेश देसूरकर यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बेळगाव जिल्हा शिवसेनेकडून हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकाऱयांच्यावतीने सम्राट अशोक चौक येथे शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, संघटक तानाजी पावशे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू कणेरी, राजू तुडयेकर, बंडू शिंदे, गंगाराम गावडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
हणमंत मजूकर यांच्याकडून अभिवादन
खडेबाजार येथे शिवसैनिक हणमंत मजूकर यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी परशराम गोंदकर, रमेश पाटील, अमोल मजूकर, विनायक कुंडेकर, हणमंत जुमानी, गंगाराम कल्लेरी, दशरथ चौकुळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.









