4 मे पासून परिक्षांचा होणार प्रारंभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीएसई मंडळाने सीबीएसईच्या 10 आणि 12 वी च्या परिक्षांचे वेळापत्रक घोषित केले आहे. बुधवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत वेळापत्रकाची माहिती देण्यात आली. हे वेळापत्रक सर्व संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या शिक्षण संस्थांमधून मिळणार आहे. सर्व विषयांचे सविस्तर पत्रक देण्यात आले.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर हे वेळापत्रका प्रसारित केले आहे. या परिक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत होणार असून कोरोनास्थितीमुळे यंदा त्या उशीरा होत आहेत.
परिक्षांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे….
10 वी परिक्षा
4 मे ः ओडिया, कन्नड, लेप्चा
6 मे ः इंग्रजी भाषा व साहित्य
10 मे ः हिंदी अभ्यासक्रम अ आणि ब
11 मे ः उर्दू, बंगाली व अन्य स्थानिक भाषा
12 मे ः पंजाबी व जर्मन
13 मे ः मल्याळी, प्रेंच, रशियन, उर्दू अभ्यासक्रम ब
15 मे ः विज्ञान थेअरी व प्रात्यक्षिक
17 मे ः पेंटींग
18 मे ः एनसीसी, गुरंग आणि संगीत
20 मे ः होम सायन्स
21 मे ः गणित स्टँडर्ड व बेसिक
22 मे ः जपानी, एलिमेंटस् ऑफ बिझनेस
25 मे ः स्थनिक तसेच विदेशी भाषा
27 मे ः सोशल सायन्स
29 मे ः इन्फॉर्मेशन टेन्कॉलॉजी
31 मे ः रिटेल व अन्य स्किल अभ्यासक्रम
2 जून ः अरबी व संस्कृत
7 जून ः काँप्युटर सायन्स
12 वी परिक्षा
4 मे ः इंग्रजी इलेक्विव्ह आणि इंग्रजी कोअर
5 मे ः टॅक्सेशन, कर्नाटक संगीत, हिंदुस्थानी संगीत
6 मे ः ट्रडिशनल नॉलेज आणि प्रॅक्टिसेस ऑफ इंडिया, नेपाळी, ऑटोमोटिव्ह, फायनान्शिअल मार्केट मॅनेजमेंट, इन्शुरन्स, इलेक्ट्रॉनिक टेन्कॉलॉजी, मेडिकल डायग्नोस्टिक्स, कुचीपुडी नृत्य, ओडीसी नृत्य
8 मे ः फिजिकल एज्युकेशन
10 मे ः इंजिनिअरिंग ग्राफिक्स, ऍप्लाईड फिजीक्स
11 मे ः टायपोग्राफी आणि काँप्युटर ऍप्लिकेशन, फॅशन स्टडीज
12 मे ः बिझनेस स्टडीज, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन
15 मे ः सकाळच्या सत्रात रिटेल, मास मिडीया स्टडीज आणि दुपारच्या सत्रात तामिळ, तेलगू, सिंधी, गुजराती, मणिपुरी, मल्याळम, उडिया, आसामी, कन्नड, तिबेटी, जर्मन, रशियन, लिंबो, लेप्चा, बोडो, टंगखुल, भूटिया, स्पॅनिश, मिझो
17 मे ः अकाउंटन्सी
18 मे ः केमिस्ट्री
19 मे ः पॉलिटिकल सायन्स
20 मे ः लीगल स्टडीज, उर्दू कोअर, सेल्समनशिप
21 मे ः दुपारच्या सत्रात उर्दू इलेक्टिव्ह, संस्कृत इलेक्टिव्ह, संस्कृत कोअर, प्रंट ऑफिस ऑपरेशन, एअरकंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन, डिझाईन
22 मे ः हेल्थ केअर, पेंटींग, स्कल्प्चर, ऍप्लाईड-कमर्शिअल आर्ट
24 मे ः सकाळच्या सत्रात प्रेंच आणि दुपारच्या सत्रात हॉर्टिकल्चर, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, कॉस्ट अकाउंटींग, शॉर्टहँड (हिंदी), म्युझिक प्रॉडक्शन, फूड न्यूट्रीशन तसेच डायलेक्टिक्स, अर्ली चाईल्डहुड केअर तसेच एज्युकेशन
28 मे ः सोशिऑलॉजी
29 मे ः इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस (न्यू), काँप्युटर सायन्स (न्यू), इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस (ओल्ड), काँप्युटर सायन्स (ओल्ड), इन्फॉर्मेशन टेन्कॉलॉजी
31 मे ः हिंदी इलेक्टिव्ह आणि हिंदी कोअर
1 जून ः गणित आणि ऍप्लाईड गणित









