खानापूर / प्रतिनिधी
अहमदाबाद येथे यावर्षी बारावी सीबीएसई केंद्राच्या परीक्षेमध्ये रोहीत रघुनाथ पाटील 96.4 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्याची जेआयटी इंजिनियरिंग कॉलेजला निवड झाली असल्याकारणाने त्याचे कॉलेजमार्फत अभिनंदन करण्यात आले. रोहीतचे बारावीपर्यंतचे शिक्षण डी. ए. व्ही. इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. तो कुसमळी (ता. खानापूर) गावचा रहिवासी व सध्या अहमदाबाद येथे न्यूवोको कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत असलेले रघुनाथ नारायण पाटील यांचे ज्येष्ठ सुपूत्र होत. तसेच कुप्पटगिरीतील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी बा. पाटील यांचा तो नातू होय. त्याला शिक्षक वर्ग, आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.









