परीक्षा रद्द करण्याची याचिकेत मागणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीएसई आणि आयसीएसईच्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सोमवारी 31 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील ममता शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या याचिकेत वस्तुनि÷ पद्धतीच्या आधारे बोर्डाने निकाल जाहीर करावा, असेही सुचविले आहे. या मागण्यांवर सोमवारच्या सुनावणीत विचार होऊ शकतो. तसेच 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फिजिकली परीक्षा रद्द करण्यासाठी आणि गेल्यावषीप्रमाणे पर्यायी मूल्यांकन योजना उपलब्ध करुन देण्यासाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. त्यावरही खंडपीठाकडून विचार होऊ शकतो.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय परीक्षा घेण्यावर ठाम असून कोरोना संसर्ग कमी होताच परीक्षांचे आयोजन करण्यासाठी कंबर कसली आहे. शिक्षणमंत्र्यांनी याबाबत मागील आठवडय़ातच बारावीच्या परीक्षेसंदर्भातील अंतिम निर्णय 1 जूनपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकते.









