नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती सीबीआयचे नवे प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी ही घोषणा केली. त्यांची या पदावर निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश रमण आणि अधीर रंजन चौधरी यांच्या उच्चाधिकार समितीने केली. जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यांचे आणि महाविकास आघाडी सरकारचे काही बदल्यांवरून मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रमुख म्हणून केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. आता त्यांची सीबीआय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कालावधी 2 वर्षांचा आहे.









