बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या (सीबीआय) पथकाने जून २०१६ मध्ये जिल्हा परिषद सदस्य आर. योगेशगौडा यांच्या हत्येप्रकरणी कॉंग्रेसचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना धारवाड जिल्ह्यातील निवासस्थानाहून गुरुवारी सकाळी ७ वाजता चौकशीसाठी घेऊन गेले.
विनयला चौकशीसाठी धारवाड येथील उपनगरी पोलिस ठाण्यात आणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकाने विनया कुलकर्णी आन त्यांचा धाकटा भाऊ विजयला कुलकर्णीलाही ताब्यात घेतले आहे.
धारवाडमधील भाजप जिल्हा पंचायत सदस्य योगेशगौडा गौडर यांचा १६ जून, २०१६ रोजी दिवसभरात निर्घृणपणे खून करण्यात आला होता.