पाच दिवस सुरू राहणार उपक्रम
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेनेच्यावतीने सीपीआर हॉस्पिटलम्ध्ये सोमवारी रूग्णांच्या नातेवाईकांना हळदयुक्त दुध वितरणाचा उपक्रम सुरू झाला. शनिवारपर्यत हा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये शिवसेनेच्यावतीने हळदयुक्त गरम दूध वाटप उपक्रम सोमवारी राबवण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरूवात झाली. रोज सकाळी 9 ते 10 या काळात शनिवारपर्यत हा उपक्रम सुरू राहणार आहे. याचा लाभ रुग्णांच्या नातेवाईकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केले. यावेळी सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, हर्षल सुर्वे, संजय जाधव, अभिजित बुकशेट, बापू कोळेकर, प्रवीण पालव, राजू इंदुलकर, निलेश जाधव, बंटी सावंत, डॉ, व्यकेटेश पवार, डॉ अपरिजित वालावलकर, डॉ, गिरीश कांबळे, डॉ, टी.मती, डॉ ,विदूर कर्णिक उपस्थित होते. ,
हळदीचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दूध-हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. त्यासाठीच सीपीआरमध्ये रुग्ण नातेवाईकांना शिवसेनेच्यावतीने एक आठवडा हळदयुक्त दुध देण्यात येणार आहे, यावेळी रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांपासून दुसऱया व्यक्तींना काही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे.










