प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी कोरोना काळासाठी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नियुक्ती झाली आहे.
सध्या हा पदभार प्रभारी अधिष्ठाता म्हणुन डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे आहे. यामुळेच या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. डॉ. म्हस्के हे सोमवारी स्विकारणार आहेत. सध्या नांदेड येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.
सीपीआरच्या अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये यांची तडाकाफडकी बदली करण्यात आली होती. यानंतर हे पद गेल्या काही महिन्यापासून रिक्त होते. दरम्यान या कालावधीत प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आला होता.