खासदार संजय मंडलिक यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, व गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक बाल रोग कक्ष स्थापन करण्यासाठी अनुक्रमे 42 व 32 खाटांची मंजूरी मिळाली असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकीय महाविद्यालय, आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयसाठी विशेष अत्याधुनिक बालरोग कक्ष स्थापन करण्यासाठी अनुक्रमे 42 आणि 32 अत्याधुनिक बालरोग कक्षांची तरदूत केली आहे. त्यासाठी आवश्यक निधी देण्याचे अभिवचन केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. याबाबत त्यांच्याकडे जुलैमध्ये 2021 मध्ये मागणी केली होती. त्याची नोंद ऑगस्टमध्ये घेवून त्यास अंतिम मंजूरी दिल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. पवार यांनी मला पत्राद्वारे कळविले असल्याचे खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक आरोग्य सुविधामध्ये नवजात बालके व लहान मुलांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापूर जिह्यामधील रुग्णालयासाठी अधिक खाटांची मागणी सातत्याने करत आलो आहे. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कोविड प्रतिसाद योजने अंतर्गत गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय येथे 32 खाटांचे बालरोग युनिट तसेच एक विशेष नवजात शिशु देखभाल युनिट आणि छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकीय महाविद्यालयअंतर्गत सीपीआर रुग्णालयासाठी 42 खाटांचे बालरोग युनिट त्याचबरोबर एक नवजात अतिदक्षता विभाग तसेच ग्रामीण रुग्णालय कोडोली, गांधीनगर, बावडा, गारगोटी, मुरगूड, चंदगड व आयजीएम इचलकरंजी येथे प्रत्येकी एक नवजात स्थिरीकरण युनिटला मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्हयातील नवजात शिशु व लहान बालके यांना आरोग्याच्यादृष्टीने चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यापुढे देखील आरोग्य सेवा मजबुत करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक सहाय्य करण्याचे अश्वासन केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री पवार यांनी दिले आहे. याव्दारे जिल्हयामध्ये अधिक चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्याच्यादृष्टीने प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी दिली.