मुंबई
बीएसईवर सलग दुसऱया दिवशी सीन्सीस टेकच्या समभागाला 20 टक्के अप्पर सर्कीट लागला आहे. शुक्रवारी समभाग विक्रमी 253 रुपयांवर व्यवहार करत होता. अलीग्रोव्ह टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीचा समभाग 44 टक्क्यांनी वाढला आहे. अलीग्रोव्ह ही तंत्रज्ञान कंपनी असून तिचा अमेरिका, युरोप आणि भारतात व्यवसाय आहे. उत्पादनांची रचना व रोबोटीक्स ऑटोमेशन सर्व्हिसेसमध्ये प्रामुख्याने कंपनी योगदान देते.









