मडगाव : सीनियर महिला एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला पराभव स्वीकारावा लागला. काल खेळविण्यात आलेल्या तिसऱया लीग सामन्यात महाराष्ट्रने गोव्याला 55 धावांनी पराभूत केले. हा सामना जयपूरच्या आरसीए अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आला. गोव्यासाठी तेजस्विनी दुर्गद आणि रुपाली चव्हाण यांनी चमकदार कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या महाराष्ट्रने आपल्या डावात निर्धारित 50 षटकात 7 बाद 247 धावा केल्या. त्यांच्या ए. पाटीलने 74 चेंडूत 14 चौकारांनी नाबाद 88, एम. मगरेने 47, एच. देशमुखने 30, ए. गायकवाडने 22 तर प्रियांका घाडकेने 14 धावा केल्या. गोव्यासाठी रुपाली चव्हाणने 42 धावांत 3, सुनंदा येत्रेकरने 51 धावांत 2 तर तेजस्विनी दुर्गदने 53 धावांत 2 गडी बाद केले. उत्तदाराखल, गोव्याचा डाव 45.2 षटकात 187 धावांत संपला. गोव्यासाठी तेजस्विनी दुर्गदने 65 चेंडूत 6 चौकार व 4 षटकार खेचून सर्वोच्च 69, विनवी गुरवने 29, पूर्वजा वेर्लेकरने 16, संजुला नाईकने 12 तर निकिता मळीकने 35 धावा केल्या. महाराष्ट्रसाठी पी. गारखेडेने 41 धावांत 4, ए. पाटील व एस. पोखरकरने प्रत्येकी 2 तर एम, मगरे व एम. सोनावणेने प्रत्येकी एक गडी बाद केला.
Previous Articleमाजी केंद्रीय मंत्री,भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन
Next Article आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सुदेवा, इंडियन ऍरोजचे विजय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









