बेंगळूर/प्रतिनिधी
लैंगिक गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असलेल्या भाजपचे मंत्री रमेश जारकीहोली यांचे नाव न घेता, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी, अश्लील सीडी ताब्यात घेऊन त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांना आधी अटक केली पाहिजे, असे म्हणाले. कुमारस्वामी शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. कुमारस्वामी म्हणाले की, यासाठी पाच कोटींचा सौदा झाला होता या प्रकरणात अनेक जण गुंतले आहेत, असे ते म्हणाले.









