भारतीय लष्कराचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली बातमी
नवी दिल्ली : भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते अशी माहिती मिळते.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली.









