मुंबई : ऑनलाईन टीम
देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वविविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. या बैठकीत त्यांनी कोरोनाचा संसर्ग गाव खेड्यापर्यंत पोहचला तर त्याला रोखणे कठीण जाईल, असा ईशारा दिला. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय बोलणी झाली याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राजेश टोपे याविषयी माहिती देतान म्हणाले की, या बैठकीत ट्रॅकिंग आपल्याला एकास २० किंवा एकास ३० पर्यंत घेऊन जाण्याची गरज असल्याची भूमिका आम्ही मांडली. सध्याच्या पद्धतीमध्ये अडचणी अनेक आहेत कारण आधी आपण क्लोजडाऊन केले होते आता मात्र सर्व गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णाच्या संपर्कात असणारे हाय रिस्क कॉनटॅक्ट म्हणजेच कुटुंबातील लोकांना ट्रेस करता येते. पण लो रिस्क कॉनटॅक्ट ट्रेस करणे कठीण जात असल्याचे सांगितले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लो रिस्क कॉनटॅक्ट ट्रेसिंगसंदर्भातील प्रश्न पंतप्रधानांसमोर प्राकर्षाने मांडल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले.
आज दुपारी देशातील काही राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर सूचना केल्या.