ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इस्रोच्या सीएमएस-01′ या संचार उपग्रहाला ‘पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही-सी 50) शी जोडण्यात आले आहे. त्याच्या सहाय्याने 17 डिसेंबरला हा संचार उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. इस्रोने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सीएमएस-01′ हा देशाचा 42 वा संचार उपग्रह आहे. सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून 17 डिसेंबरला दुपारी 3.41 वाजता याचे प्रक्षेपण होईल. हवामानातील बदलानुसार प्रक्षेपणाच्या वेळेत बदल होऊ शकतो.
सीएमएस-01 या दळणवळण उपग्रहाची रचना भारत, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांच्या मुख्य भूमीचा समावेश असलेल्या ‘एक्स्टेंडर सी बँड’मध्ये सेवा पुरवण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.









