विदेशातील कंपन्या गुंतवणुकीच्या तयारीत
मुंबई ः सीएमआय लिमिटेडने सेमिकंडक्टर क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली आहे, या घोषणेमुळे कंपनीचे समभाग चार टक्क्यांनी वधारुन 52 रुपयावर पोहोचले आहेत. यासोबतच एक महिन्यात याचा भाव हा 50 टक्केपेक्षा अधिक वाढला आहे. एक महिन्या अगोदर हा समभाग 35 रुपये होता. जो आता 52 रुपयावर गेला आहे.
सेमि कंडक्टरला चालना देण्यासाठी सरकारने 76,000 कोटी रुपयाच्या पीएलआय योजनेला मंजुरी दिली होती. यानंतर सेमीकंडक्टर बनविण्यासाठी अनेक कंपन्यांनी देशामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी इच्छा क्यक्त केली आहे. जगातील प्रमुख कंपन्यांचा या उत्पादनांमध्ये कल दिसून येत आहे.
चिप कमतरतेची समस्या
सध्या वाहन क्षेत्रासह इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱया चिपची कमतरता व इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये अडचणीचा प्रवास करत आहे. या कारणास्तव या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी संधी निर्माण होत आहे. सीएमआयचा प्रकल्प 80 हजार चौरस मीटरमध्ये पसरला आहे. परंतु हा प्रकल्प फक्त भारतातला असून जो सिल्वर सर्टिफाइड ग्रीन प्रोजेक्टसह केबलचे उत्पादन घेणार असल्याचे संकेत आहेत.
विविध कंपन्यांचा समावेश राहणार
इंटेल, टीएसएमसी, सॅमसंग, ग्लोबल फौंड्रीज यासारख्या कंपन्यांचा यामध्ये समावेश असणार असल्याचे सांगितले जाते.









