वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एका बाजूला कोरोना संकटात अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत तर दुसऱया बाजूला मात्र इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांच्या वेतनात जवळपास 27 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सलील यांना कॉम्पेंसेशनच्या (भरपाई) स्वरुपाने जवळपास 45 कोटी रुपये मिळाले आहेत. मागील आर्थिक वर्षात 2018-19 मध्ये एकूण 4.8 दशलक्ष डॉलर कॉम्पेंसेशन प्राप्त झाले आहे.
कंपनीचे चेअरमन नंदन निलेकणी यांनी स्वेच्छेने चालू वर्षात कोणत्याही प्रकारचे वेतन घेतलेले नाही. कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर युबी प्रवीण राव यांना कॉम्पेंसेशनमध्ये 29 टक्के लाभ झाला आहे. यासोबतच कंपनीमधील दोन अधिकारी रवी कुमार आणि मोहित जेशी यांच्या वेतनात 25 टक्के वाढ झाली आहे.
98 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम कोरोना काळात कंपनीने जवळपास आपल्या 98 टक्के कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. 31 मार्च रोजीच्या उपलब्ध माहितीनुसार अमेरिकेतील 50 टक्के कर्मचाऱयांकडे एचवन बी आणि एलवन व्हीसा आहे.









