23 दिवसांमध्ये एकूण समभाग 114 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे समभाग तेजीत राहिले आहेत. त्यामुळे कंपनीचे समभाग 20.5 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. मागील दोन दिवसात समभाग 40 टक्क्यांनी वधारला आहे. यामुळे चालू वर्षातील शेअर बाजारातील 23 दिवसांमध्ये आतापर्यंत 114 टक्क्यांची तेजीत राहिल्याची नोंद केली आहे. या कामगिरीमुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांची संपत्ती वर्षामध्ये 17.6 अब्ज डॉलर (1.25 लाख कोटी रुपये) वाढली आहे. ही रकम भारतामधील सर्वात मोठय़ा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफाच्या तीन पट आहे.
ज्या ट्रेडमध्ये समभाग सर्वाधिक घसरण्याचा अंदाज लावला जातो ते समभाग अगोदर विकले जातात आणि किमती घटल्यानंतर त्याची खरेदी केली जाते. यालाच शॉर्ट सेलर म्हटले जाते. अमेरिकेतील टेस्लाचे समभाग सर्वाधिक शॉर्ट सेलच होत आहेत. मागील काही दिवसांमध्ये आलेल्या कंपनीच्या समभाग तेजीमुळे शॉर्ट सेलरच्या माध्यमातून 8 अब्ज डॉलर (56,800 कोटी रुपये) बुडाले आहेत.
समभाग वधारण्याची कारणे
- शांघाय येथील नवीन प्रकल्पामधून टेस्लाला सर्वाधिक नफा होणार असल्याचे अनुमान अमेरिकन शेअर बाजारातील विश्लेषकांकडून नोंदवले आहे. याच प्रकल्पामधून मागील महिन्यात निर्मिती करण्यात आलेल्या पहिल्या मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले आहे. टेस्लासाठी चीनी बाजारपेठ मोठी फायदेशीर असल्याची नोंद केली आहे.
- टेस्लाने मागील माहिन्यात आर्थिक नफा कमाईचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये 10 वर्षात प्रथमच वर्षाच्या आधारावर नफा कमाई झाला आहे. याचा ही कंपनीचा नफा वाढण्यास फायदा झाला आहे.