लॉस वेगास
जगातील सर्वात मोठय़ा इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे सीईएस-2020 या नावानी शो मंगळवारी सुरु झालेला आहे. या शोमध्ये मानवाची बदलती शैली आणि त्यावर आधारीत असणाऱया उत्पादनांचे सादरीकरण करण्यात जगातील विविध कंपन्यांची चढाओढ पहावयास मिळत आहे. यामध्ये पहिल्या दिवशी मंगळवारी चिनी कंपन्यांचा मोठा दबदबा राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यात प्रामुख्याने ए-1 बेस्ड लाईफस्टाईलच्या उत्पादनांची धूम दिसून आली आहे. एका बाजूला लेनोवोण् आसुस, एचपी, एलजी यासारख्या कंपन्यांनी नवीन उत्पादने सादर केली आहेत. तर दुसरीकडे सोनीने इलेक्ट्रिक कन्सेप्ट कार सादर करुन वेगळेपण दर्शवले आहे. अनेक कंपन्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत सर्वाधिक उत्पादने दाखल करण्यात आली आहेत. यातून आगामी काळातील बदलती जीवनशैली दर्शवणारे उत्पादने मांडण्यात आली आहेत. उदा : प्रथमच टीसीएस स्मार्टफोन, यूएस वीजिओने रोटेटेंग साउंडबार लाँच, जूनो कंपनीचे 1 मिनिटात पाणी थंड करणारे कूलिंग मशीन सादर , सॅमसंगचा सेल्फी टाईम इनव्हीजिबल किबोर्ड दाखल केला आहे तर सॅमसंगने बॉल सारखा दिसणारा बॅली रोबोट सादर केला असून त्यांचे नियंत्रण पूर्णतहा कॅत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत राहणार आहे. तर लेनोवाने लेनोवा योगा-5 जी लॅपटॉप अमेरिकन कंपनी क्वालकॉमसोबत दाखल केला आहे. यासह अनेक बदल्यात काळातील जीवन पद्धतीवर आधारीत उत्पादने कंपन्या दाखल करणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.








