वृत्तसंस्था/ लास वेगास
लास वेगास या शहराम गेल्या 7 जानेवारीपासून सुरु असलेल्या सर्वात मोठय़ा इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे सादरकरण सुरु आहेत. यामध्ये न्युझीलँडची मंटा कंपनीकडून पाण्यावर चालणारी इलेक्ट्रिक दुचाकी सादर केली आहे. या दुचाकीचे नाव ‘मंटा-5 हायड्रोफॉयलर एक्सइ-1’ ठेवण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या दुचाकीचे विशेष म्हणजे सर्व पार्ट वेगवेगळे करता येतात आणि त्यांच्या आधारे या दुचाकीला घेऊन जाणे सोपे असल्याचे सांगितले आहे.
गाडीला एक हॅडेल दिला असून त्याच्या आधारे गाडीला कोणत्याही प्रकारे वळवणे सोपे होणार आहे. ही दुचाकी पाण्यात एका तासाच्या आत 19 किलोमीटर अंतर पूर्ण करु शकणार असून यांची किंमत 7,490 डॉलर(5,30,000 रुपये) असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
गोल स्क्रीनचा फोन
अमेरिकेतील स्टार्टअप डीटूर कंपनीने लास वेगासमधील प्रदर्शनात आगळा वेगळा स्मार्टफोन सादर केला आहे. विशेष म्हणजे या फोनला गोलाकार स्क्री देण्यात आली असून सदरच्या फोनचे नाव सर्कल फोन ठेवण्यात आले आहे. यात दोन हेडफोन जॅक मिळणार आहेत. 1990 मधील चित्रपट, दोन्ही बाजूनी बोलण्याच्या उपकरणाची आठवण करुन देणारी सुविधा या स्मार्टफोनमध्ये देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.








