ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सीआरपीएफच्या 25 डेप्युटी कमांडंटना (डीसी) नववर्षाच्या पहिल्या दिवशी पदोन्नतीची भेट मिळाली आहे. त्यांना ‘सेकंड इन कमांड’ (2-आयसी) बनवण्यात आले आहे. सध्या हे अधिकारी ज्या युनिट, बटालियन किंवा प्रतिनियुक्तीत आहेत, त्यामध्येच त्यांना बढती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळाल्यानंतर या अधिकाऱ्यांची तातडीने बदली केली जाणार नाही. सीआरपीएफ मुख्यालय आज सायंकाळी यासंदर्भात आदेश जारी करणार आहे.
पदोन्नती मिळालेल्या 25 डेप्युटी कमांडंटपैकी चार जणांना ‘शील्ड कव्हर’मध्ये पत्रे मिळाली आहेत. याचा अर्थ असा की या अधिकाऱ्यांच्या संदर्भात विभागीय औपचारिकता बाकी आहे. एखाद्या प्रकरणात या अधिकाऱ्यांविरोधात चौकशीही सुरू असू शकते. त्यांना त्यांच्या दलाच्या मुख्यालयातून मंजुरी मिळाली नसावी. ‘शील्ड कव्हर’मध्ये ज्या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले आहे, त्यामध्ये बिपीन कुमार, विवेक कुमार सिंग, अनमी शरण आणि रितेश कुमार सिंग या कमांडंटचा समावेश आहे.
पदोन्नती मिळून दोन-आयसी बनलेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये संजय कुमार, गजेंद्र बहादूर सिंग, राजेश कुमार सिंग, कुलदीपसिंग चहर, संजीव कुमार सिंग, अजय दलाल, अरिचे अँथनी महिओ, अरुण कुमार, विवेकानंद सिंग, अरुण कुमार सिंग, अयोध्या सिंग, राजीव सिंग, अरविंद सिंग यादव, श्याम कुमार चौधरी, इथापे पंडित कृष्ण राव, विक्रम कुमार, सदानंद कुमार, राजेंद्र कुमार, रामेश्वर यादव, पवन कुमार आणि सुबोध कुमार यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर असिस्टंट कमांडंटला डेप्युटी कमांडंट बनवण्यात येणार आहे.