लष्कराने केले कोरोना योद्धय़ांचे अभिनंदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांनी जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वतःला झोकून दिले आहे. अशा योद्धय़ांचे रविवारी लष्करी अधिकाऱयांनी तोंडभरून कौतुक केले. देशसेवेसाठी प्राणपणाने लढणाऱया सेनादलाने कोरोनाविरुद्धच्या लढाईतील योद्धय़ांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वंदे मातरम्चा नारा घुमला.
मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर रोहित चौधरी, कर्नल पद्मिनी एच. एस. यांच्यासह मिलिटरी हॉस्पिटलमधील अधिकाऱयांनी रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील वेगवेगळय़ा विभागांना भेटी देऊन कोरोना योद्धय़ांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले. डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱयांचे लष्करी अधिकाऱयांनी कौतुक केले.
सिव्हिल हॉस्पिटलचे आरएमओ डॉ. संजय कट्टे यांनी वेगवेगळय़ा विभागांची माहिती दिली. बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व रुग्णांवर एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कोरोना महामारीविरुद्ध स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक कर्मचारी सेवा देत आहेत.
ब्रिगेडिअर रोहित चौधरी व त्यांच्या सहकाऱयांनी स्वच्छता कर्मचाऱयांचेही खास अभिनंदन केले व त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लष्करी अधिकाऱयांनी केलेल्या गौरवामुळे कोरोनाविरुद्ध लढणाऱया योद्धय़ांचे मनोबल आणखी वाढले आहे. खऱया अर्थाने सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱया व गौरवशाली इतिहास असणाऱया मराठा लाईट इन्फंट्रीच्या अधिकाऱयांनी आपल्या सेवेची दखल घेऊन कौतुक केले याचा कोरोनायोद्धय़ांनी अभिमान बाळगला आहे.









