माजी महापौर विजय मोरे व इतरांनी केले स्वागत
प्रतिनिधी/ बेळगाव
डॉ. संजीव एम. कट्टी हे सिव्हिल हॉस्पिटलचे नवीन आरएमओ म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल बुडाचे माजी अध्यक्ष राजा देसाई व माजी महापौर विजय मोरे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले. डॉ. संजीव कट्टी हे मुळचे बेळगावचे. ते आता फॉरेन्सीक एमडी म्हणून बेंगळूर, म्हैसूर, कारवार येथे सेवा बजावत होते. आता ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणार आहेत. डॉ. संजीव कट्टी हे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि गरीब रुग्णांना चांगली सेवा डॉक्टर म्हणून ओळखले जातात.
बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलला असा एक चांगला आरएमओ मिळाल्याबद्दल राजा देसाई व माजी महापोर विजय मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. मोरे यांनी गरीब रुग्णांसाठी उत्तमोत्तम सेवा देवून बेळगाव हॉस्पिटलमधील गैरकारभाराला चाप बसवावा आणि बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलचे नाव राज्यात नावलौकिक करावे, असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या बेळगाव शहराबरोबरच जिह्यातील रुग्णही दाखल होत असतात. रुग्णांचा ओढा नेहमीच सिव्हिल हॉस्पिटलकडे असतो. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता तसेच इतर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे न्याइलाजास्तव खासगी इस्पितळाकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र आता कोणतीही अडचण आल्यास थेट मला संपर्क साधावा त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करेन, असे डॉ. कट्टी यांनी सांगितले.









