ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. शरद पवारांच्या निवासस्थान सिल्व्हर ओक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री जयंत पाटील, मंत्री राजेश टोपे, मंत्री हसन मुश्रीफ आदी नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी ५ वाजता ही बैठक पार पडणार आहे. सर्व नेते सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले असून बैठकीला सुरुवात झाली आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळं सरकारच्या अडचणीत वाढ झाल्यानं या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांची अटक ऑर्डरही जाहीर झाली असून यामध्ये ईडीच्या झोन १ चे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांनी सांगितलं की, मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिक ऊर्फ नवाब मलिक हे मनी लॉंडरिंग अॅक्ट अंतर्गत दोषी ठरले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर या अॅक्ट अंतर्गत मलिक यांच्यावर २३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २.४५ वाजता अटकेची कारवाई करण्यात येत आहे.