ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
सिल्लोड येथे बुधवारी 50 वषीय महिलेवर घरात घुसून रॉकेल टाकून पेटवण्यात आलं. या घटनेत महिला 95 टक्के भाजली होती. तिच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेची अखेर मृत्यूशी झुंज ही अपयशी ठरली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते यास अटक केली असून, त्याला दहा फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सिल्लोड तालुक्यातील 50 वषीय पीडित महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, संबंधित पीडित महिला एकटीच राहते व तिच्या दोन्ही मुलींचे लग्न यापूर्वीच झाले आहेत. 2 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी संतोष मोहिते या महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी या दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला होता.









