दिवंगत संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तवांचा पुत्र
दिवंगत संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव आणि अभिनेत्री विजेयता पंडित यांचा मुलगा अवितेश बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. अवितेशच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली असून त्याचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. अवितेश ‘सिर्फ एक फ्राइडे’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन लॉयड बॅप्टिस्टा करत असून दीपक मुकुट आणि मानसी बागला याचे निर्माते आहेत. पैसे, कार, पाटर्य़ा आणि मित्रांनी भरेलले जीवन जगणारा आणि काही घटनांनंतर एक यशस्वी अभिनेता होत स्वतःच्या आजारी आईचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेणाऱया युवकाची ही कहाणी असणार आहे. चित्रपटात महेश मांजरेकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.
अवितेशला बॉलिवूडमधील पदार्पणासाठी अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनीच चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे. या चित्रपटाचा हिस्सा होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. पटकथा वाचताच मी चित्रपटाला होकार दिला होता असे अवितेशने म्हटले आहे.









