एका गोळीची किंमत 68 रुपये असणार
नवी दिल्ली :
भारताची फार्मा कंपनी सिप्ला ऑगस्टमध्ये फेविपिरावीर औषध बाजारात आणणार आहे. सिप्लाचे हे औषध ‘सिप्लेन्झा’ या ब्रँड नावाने दाखल होणार आहे. याचा वापर कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी केला जाणार आहे. या औषधाच्या एका टॅब्लेटची किंमत 68 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने कमी किमतीत हे औषध तयार केले आहे. सिप्लाला हे औषध सुरू करण्यासाठी डीसीजीआयकडून परवानगी मिळाली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात ते बाजारात येणार असल्याचे समजते.
सिप्लाने औषध निर्मिती प्रक्रियेस गती दिली आहे. कंपनी नवीन तंत्रज्ञानाद्वारे औषध बनवित आहे. वैद्यकीय चाचण्यांमध्ये फेविपिरावीरने चांगले निकाल दिले आहेत. हे औषध संसर्ग कमी आणि मध्यम पातळीवर उपचार करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.









