नवी दिल्ली :
कोरोनाच्या लढाईसाठी आवश्यक असणारी मदत करण्यासाठी सिप्ला कंपनीनेही पुढचे पाऊल टाकले आहे. कंपनीने 25 कोटींची मदत देऊ केलीय.
कोरोनाच्या संकटाला थोपविण्यासाठी विविध टप्प्यावरुन आज मदतीचा हात दिला जात आहे. यामध्ये काही व्यावसायिक आपले नुकसान सहन करुन मदतीचा हात पुढे करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यात आता औषध कंपनी सिप्लाने मंगळवारी 25 कोटी रुपयांची मदत कोरोनाशी लढण्यासाठी दिली आहे. या मदतीमधील 9 कोटी रुपये पीएम केअर निधीत तर अन्य आठ कोटी रुपये विविध राज्यांच्या मदत निधीला देण्यात येणार असल्याचे सिप्लाने स्पष्ट केले आहे.









