अबब… महिलेच्या पोटात सहा किलोची गाठ
प्रतिनिधी / मिरज
अनेक वर्षांपासून पोट दुखीचा त्रास वारंवार पोट फुगत होते. सांगली-मिरज रस्त्यावरील सिनर्जी मल्टीस्पेसालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी महिला दाखल झाली. डॉक्टरांनी पोटात गाठ असून, या गाठीला आतडे चिकटली असल्याचे सांगितले. लेप्रोटॉमी शस्त्रक्रिया करुन सदरची गाठ बाहेर काढण्यात आली. अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड अशी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि बघतो तर काय, महिलेच्या पोटातून तब्बल सहा किलोची गाठ बाहेर आली.
लॅप्रोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आलेली महिला ही विजापूर जिह्यातील रहिवासी आहे. तिच्या पोटातील गाठीचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी सदरील महिलेस शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी या महिलेवर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांच्या देखरेखीखाली जनरल सर्जन डॉ. संतोषसिंह राजपूत, स्त्री रोगतज्ञ डॉ. स्वफ्नाली कोळेकर यांनी तब्बल दोन तास लॅप्रोटोमी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. आणि महिलेला जीवदान मिळाले.








