मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोडय़ांपैकी एक असलेल्या सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या सोशलमीडिया पेजवर ते कोणता नवा व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करतात याकडे त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच लक्ष असते. एका इव्हेंटमध्ये ओळख, त्यातून मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेल्या या जोडीने गेल्या वर्षी पुण्याच्या ढेपेवाडय़ात डेस्टिनेशन वेडिंग केले. सिध्दार्थ आणि मिताली यांची रोजची तूतूमैमै असो किंवा त्यांच्या भटकंतीचे फोटो असोत, चाहत्यांशी ते त्यांची प्रत्येक गोष्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक गोड बातमी एकत्र पोस्ट केली आहे. त्यांच्या या बातमीवर कमेंटमध्ये अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. पण ही गोड बातमी म्हणजे दुसरी तिसरी काही नसून मुंबईत या दोघांनी नवं घर घेतले असून हीच आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांना दिली आहे. दोघांनीही त्यांच्या इन्स्टापेजवर हाताच्या अंगठय़ाला शाई लावलेला फोटो शेअर करत एक नवी सुरूवात…. मुंबईत साकारलं आमचे नवे घर अशी कॅप्शन दिली आहे.
दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी लग्न केले. या दोघांनी नवे घर मुंबईतील कोणत्या भागात खरेदी केले आहे हे अदय़ाप त्यांनी सांगितलेले नाही. पण घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी शाई लावलेल्या अंगठय़ाच्या फोटोतून दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे सिध्दार्थ आणि मिताली हे एकमेकांना टायनीपांडे अशी हाक मारतात. त्यांच्या
प्रत्येक पोस्टमध्ये हे नाव हॅशटॅग केलेले असते. त्यामुळे नव्या घराच्या पोस्टमध्येही त्यांनी हे युनिक नाव टॅग केले आहे.
सिध्दार्थ सध्या छोटे उस्ताद या शोचे सूत्रसंचालन करत आहे. प्रेशर्स या मालिकेतून मितालीने टीव्हीवर पदार्पण केले. तर सुयश टिळकसोबत ती हॅशटॅग प्रेम या सिनेमात दिसली. लाडाची मी लेक गं या मालिकेतही मितालीचा अभिनय पहायला मिळाली.









