प्रतिनिधी/ बेळगाव
सिध्दार्थ बोर्ल्डींग शहापूर यांच्यावतीने बीएड परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला आहे. कारभार गल्ली, वडगाव येथील दीपा जयराम हवालदार या मुलीने सागर बीएड कॉलेजमधून यश संपादन केले. वडिल जयराम आप्पाजी हवालदार हे विणकर व्यवसाय करतात. त्यांना तीने मदत करत हे यश संपादन केल्याबद्दल माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला आहे.
शहापूर येथील सिध्दार्थ बोर्ल्डींगमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीपा हिने वडिलांना वेळोवेळी मदत केली. हे काम करतच तीने शिक्षण घेतले. बीएड परीक्षेत 88 टक्के गुण घेतले. हे तीचे यश वाखाणण्याजोगे आहे. त्याबद्दल तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. मारुती कामाण्णाचे यांच्यासह इतर मान्यवर व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.









