किरण जाधव तर्फे विद्यार्थाना मध्यान आहाराचे वाटप
बेळगाव / प्रतिनिधी
पंडित दिनदयाल उपाध्यय यांची 105 जयंती 25 सप्टेंबर रोजा देशभर समर्पण दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्याचे औचित साधुन भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य अध्यक्ष किरण जाधव यांनी शहापूर येथील सिध्दार्थ बोर्डिगं मधील विद्यार्थांना मध्यान्ह आहार देऊन साजरा करण्यात आला.
प्रारंभी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी प्रास्ताविक करुन किरण जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. आपापसातील मतभेद दुर ठेवून आपण विकासाच्या दृष्टीने एकत्र येऊया असे सांगून किरण जाधव यांनी सिध्दार्थ बोर्डिंगच्या इमारत, गोशाळा व इतर समस्या सोडविण्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोर्डिंगचे अध्यक्ष संतोष होंगल यांनी स्वागत शाल अर्पण करुन केले. अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव यांनी शाल फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन किरण जाधव व सहकाऱयांचा सत्कार केला. सुरेंद्र देसाई व अनंत लाड यांनी किरण जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी भाजपा मोर्चाचे पदाधिकारी गदेश नंदगडकर, चेतन नंदगडकर, राजन जाधव, अक्षय साळवी, शिवा मगन्नावर तसेच बेडिंगचे उपाध्यक्ष हीरालाल पटेल, संजय चौगुले, गोपाळराव सडेकर, शिवाजी पवार, पवित्रा हिरेमठ, रुपाताई, सावंत, लक्ष्मीबाई कांबळे, रेणुका सुर्यवंशी, कविता कांबळे व इतर उपस्थित होते. संतोष होंगल यांनी आभार मानले.









