कुर्डुवाडी / प्रतिनिधी
सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडी नं.१२११५ ने एसी ३ टायर मधून कल्याण ते सोलापुर असा प्रवास करत असताना कुर्डुवाडी स्थानकादरम्यान अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ४८ हजार २२४ रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर साहित्य असणारी हँडबॅग लांबवली. ही घटना दि.४ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास कुर्डुवाडी स्थानकादरम्यान घडली. याबाबत रचप्पा वीरभद्रप्पा सुतार स्वामी समर्थ हाऊसींग सोसायटी, कुलगांव-बदलापूर यांनी मेलद्वारे दिलेल्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी सुतार हे दि.४ फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडी क्र.१२११५ या गाडीने कोच नं ३एसी,बी १ सीट नं ६५,६८ वरून कल्याण ते सोलापूर असा प्रवास करीत असताना गाडी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकादरम्यान आली असता पहाटे ५ वा.ते ५.३० वा. चे दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीची हँडबॅग ज्यामध्ये १ लाख ६० हजार रुपये किमतीचे ४ तोळे वजनाचे मंगळसूत्र,८० हजार रु.किमतीच्या सोन्याच्या २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या,७ हजार ४९९ रुपयांचा मोबाइल ,३७५ रु. औषध,५० रू. किमतीचा स्टील चा डबा, ३०० रू किमतीची काळ्या रंगीची पर्स असा एकूण २ लाख ४८ हजार २२४ रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबत कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांत २३ फेब्रुवारी रोजी उशीराने गुन्हा दाखल झाला आहे