प्रतिनिधी / बेळगाव
सिद्धी महिला मंडळ आणि टिळकवाडी पोलीसस्थानक यांच्यावतीने मंगळवार दि. 15 रोजी मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिद्धी महिला मंडळाच्या सदस्यांनी प्रथम दीपोत्सव साजरा केला. त्यानंतर टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांनी महिला जनजागृतीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी जनतेला कोणतीही समस्या असल्यास 112 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतील, असेही बोलताना सांगितले.
प्रारंभी सेपेटरी अनिता पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्षा सुनीता सुभेदार यांनी आभार मानले. यावेळी नंदिता, वर्षा गिलबिले, अश्विनी गोडसे, ज्योती कलघटगी, दीपा खुरकुटे, सुजाता लोखंडे यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.









