प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ लोहार गल्ली येथील श्री सिद्धीविनायक साप्ताहिक वार्षिक फंडातर्फे वर्षपूर्तीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांची सांगता होऊन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
रांगोळी स्पर्धा – 1) अक्षता मुतगेकर 2) राजश्री लोहार 3) बसवराज सुणगार, 4) मानसी मुतगेकर, 5) दिशा बोनगाळे. कब्बड्डी स्पर्धा – सिद्धीविनायक संघ विजेता तर भगतसिंग संघ उपविजेता. किल्ला स्पर्धा – 1) सचिन सायनाक व त्यांचे सहकारी रघुनाथपेठ अनगोळ (संतोष गड), 2) नितीन ताशिलदार आणि सहकारी, श्रीराम कॉलनी अनगोळ. डान्स स्पर्धा -1) डार्लिंग ग्रुप (पृथ्वीराज चव्हाण आणि सहकारी), 2) विद्यानगर अनगोळ यांना प्रमुख पाहुणे संतोष पुजेरी, बाबू सुणगार, संदीप भेंडीगेरी, बसवराज सुणगार, श्रीनिवास सुणगार, इरन्ना कुंभार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भावेश ताशिलदार, संदेश कलखांबकर, आकाश सुणगार, सचिन आर. के., सागर लोहार आदींनी विशेष परिश्रम घेतले.









