बेंगळूर
सिद्धार्थ लाल यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती कायम राहिली असल्याची माहिती आयशर मोटर्सने दिली आहे. आयशर मोटर्सच्या समभागधारकांनी त्यांच्या पुर्ननियुक्तीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आणखी 5 वर्षे लाल हे आपल्या पदावर कार्यरत असणार आहेत. पुर्ननियुक्तीच्या बाजुने 93 टक्के सभासदांनी मतदान केले आहे. त्यांना या काळात 10 टक्के वेतनवाढही मिळणार आहे.









