प्रतिनिधी/ बेळगाव
जागतिक महिला दिनानिमित्त सिद्धकला युथ क्लब चिदंबरनगर, अनगोळ यांच्यावतीने कलादर्पण प्रस्तुत ‘सारे तिच्याचसाठी’ हा संगीताचा कार्यक्रम रविवार दि. 7 रोजी सायंकाळी 5.30 वाजता श्री चिदंबरेश्वर मंदिर चिदंबरनगर, अनगोळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गायिका कल्याणी गजगेश्वर यांचे गायन होणार आहे. तबल्यावर नरेंद्र चारी-मुंबई, संवादिनीवर मुकुंद गोरे व टाळसाथ सुधीर बोंदे करणार आहेत. रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धकला युथ क्लबचे अध्यक्ष अरुण गावडे यांनी केले आहे.









