प्रतिनिधी /बेळगाव
येथील शशी सिदनाळ फौंडेशनच्यावतीने बेळगाव शहर पोलिसांसाठी मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. 3 हजार वॉईल्ड क्राप्टचे मास्क, 100 मिलीच्या 2 हजार सॅनिटायझरच्या बाटल्या, 1 हजार रबरी हॅन्डग्लोज व प्रत्येकी 5 लीटरच्या 20 सॅनिटायझरचे कॅन पोलीस दलासाठी देण्यात आले. फौंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय सिदनाळ, अक्षय देशपांडे, अक्षय राजपूत, शिवू कड्डेण्णावर, मनू कब्बूर, सागर भग्यागोळ आदी यावेळी उपस्थित होते.









