वार्ताहर/ अकोळ
सिदनाळ येथील अंगणवाडी क्र. चार इमारतीचे काम पूर्ण झाले असून त्याची पाहणी जि. पं. सदस्य राजू पवार, ग्रा. पं. अध्यक्ष पोपट मगदूम, राजू पाटील, प्रदीप पाटील यांनी केली. याप्रसंगी बोलताना पोपट मगदूम म्हणाले, ग्रा. पं. च्या उद्योग खात्री योजना व महिला व बाल कल्याण खाते निपाणी यांच्या निधीतून सदर इमारत मराठी शाळेच्या आवारात बांधण्यात आली आहे. सदर इमारतीची रंगरंगोटी व चित्रे आदी कामे दर्जेदार झाली आहेत सदरील इमारतीचे लवकरच उद्घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले राजू पवार यांनी इमारतीचे काम पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी आनंदा नेजे, उदय पाटील, सुकुमार कोगनोळे, शाळेचे मुख्याध्यापक एम. एम. राजगोलकर, एन. के. सुतार, रणदिवे आदी उपस्थित होते. मंगल नलवडे यांनी आभार मानले.









