वृत्तसंस्था/ हॅले
आगामी विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वी येथे होणाऱया एटीपी टूरवरील हॅले आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतून पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील उपविजेत्या ग्रीकच्या सित्सिपसने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे.
विंबल्डन स्पर्धेपूर्वीची हॅलेतील ही शेवटची सरावाची ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धा आहे. हॅले स्पर्धेमध्ये यापूर्वी सित्सिपसने स्पर्धा आयोजकाकडून प्रवेशासाठी वाईल्डकार्डचा स्वीकार केला होता. या स्पर्धेत तो पुरूष दुहेरीत आपला भाऊ पेट्रोससमवेत खेळणार होता. पेंच स्पर्धेची अंतिम लढत होण्याच्या काही वेळ आधी सित्सिपसला त्याच्या आजीचे निधन झाल्याचे वृत्त समजले होते. तशाही स्थितीत त्याने अंतिम लढत खेळली होती. पण हॅले स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.









