ऑनलाईन टीम / सितापूर :
उत्तर प्रदेशात गॅस लीक झाल्याने सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. सितापूर जिह्यामध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कार्पेट आणि ऍसिड फॅक्टरीमध्ये वायुगळती झाली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन लहान मुल आणि एका महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस, जिल्हाधिकारी अणि आरोग्य विभागाचं एक पथक घटनास्थळी पोहोचले. वायुगळतीमुळे आजूबाजूच्या परिसरातील 5 श्वान आणि गुरांचाही मृत्यू झाला आहे. तसेच आजूबाजूला दुर्घंधी पसरल्यानं लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.









