वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियात झालेल्या पाचव्या ए लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सिडनी एफसी संघाने पटकाविले. रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सिडनी एफसीने मेलबोर्न सिटीचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. हा अंतिम सामना चुरशीचा झाला. निर्धारित 90 मिनिटांच्या कालावधीत गोल कोंडी कायम राहिल्याने पंचांनी जादा वेळेचा अवलंब केला. सिडनी एफसी संघातील रेयान ग्रँटने 100 व्या मिनिटाला एकमेव निर्णायक विजयी गोल नोंदविला. सिडनी एफसी संघाने ही स्पर्धा पाचव्यांदा जिंकली आहे. मेलबोर्न सिटी संघाने ही स्पर्धा यापूर्वी चारवेळा जिंकली होती.









