वृत्तसंस्था/ होबार्ट
ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सने ब्रिस्बेन हिटचा 5 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात भारताच्या शफाली वर्माने अर्धशतक झळकविले. गोलंदाजीत राधा यादवची कामगिरी महत्त्वाची ठरली.
या सामन्यात सिडनी सिक्सर्सतर्फे खेळताना भारताच्या शफाली वर्माने 50 चेंडूत 6 चौकारांसह 57 धावा जमविल्या. कर्णधार पेरीने 33 चेंडूत जलद 27 धावा जमविल्याने सिडनी सिक्सर्सने 19.3 षटकांत 5 बाद 129 धावा जमवित हा सामना 5 गडय़ांनी जिंकला.









