प्रतिनिधी / बेळगाव
सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयच्या अलुम्नि सेलच्या विद्यार्थ्यांनी ‘अलुम्नि टोक्स’चे आयोजन केले होते. वर्षातील पाहिले पुष्प युट्यूब वरिल सिडनहॅम अलुम्नि सेलच्या चॅनेलवर 20 सप्टेंबर ला संध्याकाळी 04.00 वाजता प्रसारित करण्यात आले. सुप्रसिद्ध अलुम्नि उद्योजक श्री. दिलिप पिरामल ह्यांच्याशी ‘जीवनाची मूलभूत तत्त्वे आणि व्यवसायातील विविध अनुभव’ ह्यावर आधारित लाईव्ह / थेट संवाद साधायची संधी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच युट्यूबच्या लाईव्ह चॅट मध्ये सुद्धा प्रेक्षकांना प्रश्न विचारायची संधी होती. श्री. दिलिप पिरामल , हे गेली 40 वर्षे व्हीआयपी इंडस्ट्रीज चे अध्यक्ष (चेरमन) आहेत. कार्यक्रमाचा उद्देश मुख्यतः त्यांच्या अनुभवातून बोध घेणे व त्यांच्या उपदेशाचा उत्तमरीत्या आपल्या जीवनात वापर करणे हा होता. निश्चितच उद्देश सफल झाला.
विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले त्यात आर्थिक धोरणे , एखाद्या उद्योजकाने उदोगविस्तार करताना कशा चुका टाळाव्यात इत्यादी. तसेच , त्यांनी चारित्र्याची चतुःसूत्री सांगितली. एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य हे केवळ ती व्यक्ती व्यभिचार करते म्हणजे वाईट असे न मानता आपण त्या व्यक्तीत प्रामाणिकता , दया , न्याय्य वागणूक व खरेपणा स्वताःप्रति तसेच दुसऱ्या प्रति आहे का हे ही ध्यानात घ्यावे.
ह्यात विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षक म्हणून उपस्थिती नोंदवली. अवघ्या ५ तासात व्हिडिओ ला १६०० हुन अधिक दर्शक लाभले. ह्याच्या आयोजनासाठी सिडनहॅम प्राचार्य डॉ. संगीता पकडे , अलुम्नि सेलचे प्रभारी प्राध्यापक डॉ. रितेश सिंघल ह्यांनी मोलाचे सहकार्य केले. अध्यक्ष कु. यश बाबरेकर , उपाध्यक्ष कु. अंकिता खरे तसेच सगळ्या टीम ने ह्याचे नियोजन केले. कु. हिमानी रहाळकर कु. मुस्कान कनोजीआ ह्यांच्या खुमासदार निवेदनाद्वारे कार्यक्रम अजून रंगला. तुम्ही युट्यूब वरिल सिडनहॅम अलुम्नि सेलच्या चेनेलवर हा कार्यक्रम नक्की बघा.