मुंबई
सिटी बँकेने खुल्या बाजारातील व्यवहारानुसार वेदांता लिमिटेडचे 1200 कोटी रुपयांचे समभाग नुकतेच विक्री केले असल्याची माहिती आहे. या संदर्भातली माहिती सिटी बँकेने शेअर बाजाराला नुकतीच दिली. मिळालेल्या माहितीनुसार वेदांता लिमिटेडचे 3.2 कोटी समभाग 314.65 रुपये प्रति समभाग भावाच्या माध्यमातून विक्री करण्यात आले आहेत. या व्यवहारानंतर वेदांता लिमिटेडचा समभागाचा भाव मात्र शेअर बाजारात 0.74 टक्के घसरण नोंदवत होता.









