गुरुग्राम
जमिनीच्या व्यवहारात लक्ष घालणारी कंपनी सिग्नेचर ग्लोबल यांचा हरियाणात गुरुग्राम येथे परवडणाऱया घरांचा प्रकल्प साकारला जाणार आहे. सदरच्या प्रकल्पामध्ये कंपनीने 310 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. 9 एकराच्या जागेत होणाऱया बांधकाम प्रकल्पात 1 हजार 141 फ्लॅटस्ची बांधणी होणार आहे. प्रकल्पातील फ्लॅटस्च्या किंमती 17 लाख 56 हजार रुपयांपासून ते 28 लाख रुपयांपर्यंत असणार आहेत.









