खून करुन मृतदेहाचे तुकडे बोअरवेलमध्ये टाकल्याचा संशय
प्रतिनिधी / मिरज
दारु-जेवणाची पार्टी करत असताना सिगारेटचे पाकिट आणून देण्यास सांगून मित्रांबरोबरच भांडण काढल्याने दोघा मित्रांनी संगनमत करुन कोयता आणि दगडाने मारहाण करुन मित्राचाच खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील भोसे येथे गुरूवारी रात्री पंधरा दिवसांनंतर उघडकीस आली. दत्तात्रय शामराव झांबरे (वय 24, रा. भोसे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी अमोल खामकर (वय 27) आणि सागर सावंत (वय 25) या दोघा संशयीतांना अटक केली आहे.
दरम्यान, सदर दोघांनी खून करुन मयत दत्तात्रय याच्या शरिराचे तुकडे बोअरवेलमध्ये टाकले असल्याचा संशय आहे. मयत व्यक्तीचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याने मयत व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.