प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या काळात शिक्षक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एन.बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग केगाव सोलापूर या महाविद्यालयमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी ॲटोमॅटीक टचलेस हॅन्ड सॅनीटायझर मशीन बनवली आहे. यामुळे कुणाचा संपर्क होणार नाही आणि महाविद्यालयात कोरोनाचा विळखा वाढणार नाही.
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूची महामारी पसरली आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ऑटोमॅटिक टचलेस हांड सॅनीटायझर मशीन ही बनवली आहे. ही मशीन बनवण्याचे कारण असे की, मार्केटमध्ये अनेक पेडल बेस ऑपरेटेड मशीन उपलब्ध आहेत व त्याचे स्प्रिंग निघणे व तो मशीन खाली पडणे अश्या प्रकारच्या आडचणी निर्मीण होत आहेत आणि माणसाचा व त्या मशीनचा संपर्क येतो व विषाणू पसरण्याची शक्यता असते त्यामुळे आम्ही ही टचलेस सॅनिटायझर मशीन बनवली आहे. ही मशीन टचलेस असल्यामुळे माणसाचा व मशीनचा संपर्क येत नाही आणि विषाणू पसरण्याची शक्यतापण कमी होते.
ही मशीन पुर्णपने एसी इलेक्ट्रॉनिक कम पॉईंट्सने बनलेली असून या जेव्हा आपण या मशीनखाली हात धरतो तेव्हा सेन्सरमुळे ॲटोमॅटीक सॅनिटायझर स्प्रे होतो. या मशीनला 12 होल्ड इनपुट सप्लाय द्यावा लागेल व ह्या मशीनची 1 लिटर सॅनिटायझर साठवण्याती क्षमता आहे. ही मशीन हरिबा तानाजी गेजगे , शुभम निकाते, सारिका ताटीपामूल साक्षी गोगी, सोनाली रायकर यांनी बनवली आहे.
Previous Articleखेडमध्ये दुकान फोडत सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास
Next Article महाराष्ट्र : कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 24,581 वर









