सावंतवाडी/प्रतिनिधी-
रक्तदान व अवयवदान बाबत जनजागृती होण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या पत्रलेखन स्पर्धेत सर्व गटातून डोंबिवली येथील प्रफुल्ल अनंत साने सर्वोत्कृष्ट ठरले. या स्पर्धेत खुल्या गटात भिरवंडे येथील किरण मोतीराम सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही संस्था रक्तदान, अवयवदान देहदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था आहे. या स्पर्धेत राज्यभरातून ३६४ स्पर्धकांनी घेतला सहभाग घेतला.
स्पर्धेचा उर्वरीत निकाल पुढील प्रमाणे- शालेय गट- (पाचवी ते सातवी) प्रथम- हर्षिता नयनेश गावडे ६ वी (आरवली), शालेय गट (८ वी ते १० वी) प्रथम- वैदेही अनिल सावंत (नाटळ), या स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैभव आईर, अँड. संदीप चांदेकर, साहित्यिक चंद्रकांत सावंत, प्रकाश तेंडोलकर यांनी केले.









